Ticker

6/recent/ticker-posts

MJPJAY आता सर्वाना ₹५ लाख विमा!! शासनाचा निर्णय... नवीन GR जाहीर

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana -आता सर्वांना  ५.०० लाखांचा विमा!! नवीन GR

तर चला आजच्या या पोस्ट मध्ये जाणून घेवूया याबद्दल ची सविस्त्तर माहिती.

१. शासन निर्णय नुसार आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अंतर्गत आता सर्वाना ₹५ लाखांचा विमा मिळणार आहे.

२. तसेच या नवीन प्रधानमंत्री जन आरोग्य येाजनेमध्ये एकूण ऊपचार संख्येत वाढ होऊन ही ऊपचार संख्या १३५६ एवढी करण्यात आली आहे व एवढेच ऊपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

३. महात्मा फुले जन अरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये रुग्णालयांची संख्या १००० एवढी होती आता हीच संख्या १३५० इतकी करण्यात आली आहे.

४. तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा उपचार खर्च प्रती रुग्ण ₹३०,०००/- ऐवजी  
१ लाख इतका करण्यात येणार आहे तसेच या विमा योजनेचाही समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करण्यात येणार आहे.

५. या योजने अंतर्गत सध्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण ₹२.५० लाख एवढी होती ती आता ₹४.५० लाख एवढी करण्यात आली आहे.

६.. सदर योजने अंतर्गत महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या भागातील महाराष्ट्रातील ८ जिल्हे व सीमेलगतच्या कर्नाटक राज्यातील ४ जिल्हे यांनाही समाविष्ठ करण्यात आले आहे.


👉 हे पण आवश्य वाचा 👈


      लाभार्ती घटक




👉 GR व उपचारांची माहिती साठी click करा- click here

👉हॉस्पिटल list साठी click करा- click here




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या