केशरी रेशन कार्ड धारकांना प्रती व्यक्ती दर महिना मिळणार ₹१५०/- अनुदान. आजच ह्या पद्धतिने करा अर्ज.
१. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील
औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि बुलढाणा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हातील
कुटुंबियांना ह्याचा लाभ होणार आहे.
२. ह्या आधी केंद्र शासनातर्फे Non NFSA योजने अंतर्गत लाभार्थी कुटुंबियांना प्रती महिना प्रती सदस्य ५ किलो
अन्नधान्य ( ₹२.००/- प्रती किलो गहू व ₹३.००/- प्रती किलो तांदूळ) असे वाटप करण्यात येत
होते.
३. तथापि आता केंद्र शासनाच्या नवीन GR नुसार या पुढे शेतकरी योजनेतील लाभार्त्याना अन्न धान्य
ऐवजी थेट रोख रक्कम (Direct Benefit Transfer-DBT)
लाभार्त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे कारण या पुढे
गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या GR मध्ये नमूद केल आहे.
४. महाराष्ट्र राज्यातील वरील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त
जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ समाविष्ट न झालेल्या एपीएल
(केसरी) रेशन कार्ड शेतकरी धारकांना या GR नुसार प्रती महिना प्रती लाभार्ती ₹१५०/- इतकी रक्कम थेट बँक
खात्यात जमा (Direct Benefit Transfer-DBT) करण्यात येणार आहे.
पात्रता :-
१. एपीएल (केसरी) रेशन कार्ड असणे गरजेचे आहे व तसेच रेशन कार्ड ची RCMS (Ration Card Management System) वर नोंद असणे आवश्यक आहे.
२. वरील RCMS (Ration Card Management System) व बँक खाते सोबत प्रत्येक लाभार्त्याचा आधार क्रमांक लिंक
असणे आवश्यक आहे.
३. तसेच
प्रत्येक लाभार्त्याला (Direct Benefit Transfer-DBT) साठी वरील नमूद कागद पत्रे सोबत व बँक खाते तपशील या सोबत
एक online व offline फॉर्म भरणे आवश्यक आहे.
अश्या प्रकारे अर्ज पूर्तता व Direct Benefit Transfer (DBT) या प्रणाली वर यशवी
रित्या नोंदणी झाल्या नंतर सदर रक्कम दरमहा महिला कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर जमा
करण्यात येईल त ही रक्कम जानेवारी २०२३ पासून तुमच्या खात्यात जमा होणार आहे.
तरी अधिक माहिती साठी खालील लिंक वर click करा
0 टिप्पण्या