राज्य सरकारने मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ मध्ये ३४ जिल्हा परिषदांमधील पदांची भरती प्रक्रिया राबवली होती. मात्र, या परीक्षा नंतर रद्द करण्यात आल्या. त्यामुळे उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
राज्यातील दोन लाख 38 हजार 380 हून अधिक उमेदवारांचे 21 कोटी 70 लाख 64 हजार 422 रुपये परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या 18 हजार 866 अर्जदारांचे 1 कोटी 71 लाख 58 हजार 853 रुपये परत करण्यात येणार आहेत. मार्च 2019 मध्ये, ग्रामविकास विभागाने राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 18 संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तसेच ऑगस्ट 2021 मध्ये जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया वेळेत राबविण्यात आली. राज्य सरकारने मार्च 2019 आणि ऑगस्ट 2021 मध्ये 34 जिल्हा परिषदांमधील पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली होती. मात्र, नंतर या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ZP अर्ज शुल्क परतावा 2023 साठी पायऱ्या जाणून घ्या:
या भरती प्रक्रियेत आकृतिबंध निश्चित करताना दिव्यांगांच्या जागा निश्चित करण्यात आल्या नव्हत्या. यामुळे या भरती प्रक्रियेला आक्षेप आले. भरती प्रक्रियेस झालेला उशीर व राज्य सरकारने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवीन भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याने २१ ऑक्टोबर २०२२ ला ही भरती प्रक्रिया रद्द केली.
या वेळी संबंधित भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने ११ एप्रिलला ३४ जिल्हा परिषदांनी ही रक्कम परत करण्यासाठी मान्यता दिली होती. त्यानुसार कोकण विभागाच्या उपायुक्तांनी सर्व जिल्हा परिषदांना २१ कोटी ७० लाख ६४ हजार ४२२ रुपये परत केले आहेत.
रिफंड मिळवण्यासाठी खालील steps follow करा:
1. तुमच्या तपशीलासाठी तुमच्या अर्ज क्रमांक/अॅप्लिकेशन आयडीसह लॉगिन करा.
2. टेबलमधील तुमचा अर्ज क्रमांक / अर्ज आयडी वर क्लिक करून तपशील सत्यापित करा.
3. अपडेट बटणावर क्लिक करा आणि योग्य बँक तपशीलांसह फॉर्म भरा.
4. OTP सह तुमचे तपशील प्रमाणीकृत करा.
5. तपशील जतन करण्यापूर्वी पूर्वावलोकन पृष्ठावरील तपशील सत्यापित करा.
6. तपशील जतन करा.
अधिक माहिती साठी कृपया दिलेली माहिती अवश्य वाचावी.
पूर्ण माहिती | येथे click करा |
फी रिफंड लिंक |
0 टिप्पण्या