Ticker

6/recent/ticker-posts

MIDC Bharti 2023, महाराष्ट्र विकास औद्योगिक महामंडळ भरती २०२३

MIDC Bharti 2023 महाराष्ट्र विकास औद्योगिक महामंडळात भरती 802 रिक्त पदांचीसाठी 



पदाचे नाव – कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल).


पद संख्या – ८०२  पदे

शैषणिक पात्रता – पदानुसार

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – २१ ते ३८ वर्षे ( राखीव गटासाठी Pdf चेक करा.)

अर्जाची पध्दत – online / ऑनलायीन

अर्ज सुरु होण्याची तारीख – २ सेप्टेंबर २०२३ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सेप्टेंबर २०२३ 

परीक्षा शुल्क – खुला वर्ग – १०००/- रु.   राखीव वर्ग – १००/- रु.

वेतन श्रेणी – १९९००/- रु. ते २०८७००/- रु. पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ - https://www.midcindia.org/recruitment/


पदनिहाय वेतनश्रेणी


कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – अ –

वेतनश्रेणी :  ६७७००-२०८७००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी किमान ३ वर्षांचा अनुभव तसेच पदवीधारकांसाठी ७ वर्षांचा अनुभव.


उप अभियंता (स्थापत्य गट – अ –

वेतनश्रेणी : ५६१००-१७७५००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.


उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट-अ –

वेतनश्रेणी: ५६१००-१७७५००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.


सहयोगी रचनाकार गट – अ –

वेतनश्रेणी : ६७७००-२०८७००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्रज्ञ विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (Town Planning) किंवा Industrial Town Planning मधील पदवी / पदवीका.


उप रचनाकार गट – अ –

वेतनश्रेणी  ५६१००-१७७५००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना अथवा तत्संबंधीच्या कामाविषयीचा किमान ३ वर्षाचा अनुभव.


उप मुख्य लेखा अधिकारी गट – अ –

वेतनश्रेणी  ५६१००-१७७५००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील (MBA) (Finance) किमान B+ किंवा तत्सम श्रेणी.


सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट – ब –

वेतनश्रेणी - ४१८००-१३२३००

पात्रता व अर्हता :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी.


सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – ब –

वेतनश्रेणी - ४१८००-१३२३००

पात्रता व अर्हता :- यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी.


सहाय्यक रचनाकार गट- ब –

वेतनश्रेणी - ४१८००-१३२३००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र/ नगररचना या विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणा-या उमेदवारांमधून.


सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट – ब –

वेतनश्रेणी - ४१८००-१३२३००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील पदवी.


लेखा अधिकारी गट – ब –

वेतनश्रेणी - ४१८००-१३२३००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.


क्षेत्र व्यवस्थापक गट-ब –

वेतनश्रेणी - ४१८००-१३२३००

पात्रता व अर्हता :- कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.


कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट – क –

वेतनश्रेणी - ३८६००- १२२८००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.


कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – क –

वेतनश्रेणी - ३८६००-१२२८००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.


घुलेखक (उच्च श्रेणी) गट – क –

वेतनश्रेणी - ४१८००-१३२३००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. तसेच इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १२० श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण.


लघुलेखक (निम्न श्रेणी) गट – क –

वेतनश्रेणी - ३८६०० -१२२८००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. व टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.


लघुटंकलेखक गट – क –

वेतनश्रेणी - १९९००-६३२००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ६० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.


सहाय्यक गट – क –

वेतनश्रेणी - ३५४००-११२४००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. सेवेत दाखल झाल्यानंतर २ वर्षांच्या आत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.


लिपिक टंकलेखक गट – क –

वेतनश्रेणी - १९९००-६३२००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि… वेगाची परीक्षा उत्तीर्ण. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.


वरिष्ठ लेखापाल गट- क –

वेतनश्रेणी - ३८६००- १२२८००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.


तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) गट – क –

वेतनश्रेणी - २५५००-८११००

पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य / अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.


वीजतंत्री (श्रेणी-२) गट- क –

वेतनश्रेणी - २५५००-८११००

पात्रता व अर्हता :- शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे मिता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक.


पंपचालक (श्रेणी-२) गट – क –

वेतनश्रेणी - १९९००-६३२००

पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय वा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.


जोडारी (श्रेणी-२) गट- क –

वेतनश्रेणी - १९९००-६३२००

पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.


सहाय्यक आरेखक गट- क –

वेतनश्रेणी - २५५००-८११००

पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन १२ वी परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता तसेच स्थापत्य (अभियांत्रिकी) मधील पदविका किंवा शासकीय अथवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ‘आरेखन’ या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. संगणक प्रणालीतील Auto CAD प्रणालीचा : क्रम पूर्ण. अनुभवास प्राधान्य.


अनुरेखक गट- क –

वेतनश्रेणी - २१७००-६९१००

पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण. संगणकामधील Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.


गाळणी निरिक्षक गट- क –

वेतनश्रेणी - २९२०० ९२३००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची (रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह) विज्ञान शाखेतील पदवी.


भूमापक गट – क –

वेतनश्रेणी - २५५००-८११००

पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण. संगणक प्रणालीचा Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.


विभागीय अग्निशमन अधिकारी गट-अ –

वेतनश्रेणी - ५६१००-१७७५००

पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग (बी.ई. फायर) अथवा अॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरींग उत्तीर्ण.


सहायक अग्निशमन अधिकारी गट – क –

वेतनश्रेणी - ३८६००- १२२८००

शैक्षणिक अर्हता :- बी.एससी. भौतिक शास्त्र किंवा रसायन शास्त्र विषय घेऊन किमान ५० टक्के मार्कांनी उत्तीर्ण असावा. किंवा बी.एससी. आयटी किमान ५० टक्के मार्क. किंवा बी.ई. सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचा सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवीका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.


कनिष्ठ संचार अधिकारी गट -क –

वेतनश्रेणी - ३५४००-११२४००

पात्रता व अर्हता :- बी. ई. (इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन) किंवा बी.ई.(इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा बी. ई. कॉम्प्युटर (कम्युनिकेशन सह) किंवा बी.ई. रेडीओ इंजिनिअरींग किंवा बी.ई. इन्स्ट्युमेंटेशन किंवा एम.एससी. इन्स्ट्युमेंटेशन किंवा. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरींग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.


वीजतंत्री – श्रेणी २ (ऑटोमोबाईल) गट- क –

वेतनश्रेणी - २५५००-८११००

पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. शासनमान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रीशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा.


चालक यंत्र चालक गट-क –

वेतनश्रेणी - २१७००-६९१००

पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. वाहन चालक या पदावर ३ वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. वैध जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.


अग्निशमन विमोचक गट- क –

वेतनश्रेणी - १९९००-६३२००

पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण असणे आवश्यक. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.

एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक).



ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

अ.क्र.

तपशील

दिनांक

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक

०२/०९/२०२३

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

२५/०९/२०२३  

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत

२५/०९/२०२३

परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक

परीक्षेच्या आधी ७ दिवस



अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.

PDF जाहिरात

 येथे click करा

ऑनलाईन अर्ज

लिंक ०२/०९/२०२३ पासून संकेतस्थळावर उपलब्ध होईल

अधिकृत वेबसाईट

https://www.midcindia.org/recruitment/

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या